वासोटा, कोयना परिसर चार महिने बंद-: अभयारण्य परिसर अतिवृष्टीचा, बोटिंग क्लबच्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:56 IST2018-06-16T23:56:56+5:302018-06-16T23:56:56+5:30
सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेला वासोटा किल्ला तसेच कोयना अभयारण्यात जाण्यास वन विभागाच्या वतीने प्रवेश मनाई करण्यात आली आाहे. अतिवृष्टी, वादळी वारे या नैसर्गिक आपत्तीमध्ये

वासोटा, कोयना परिसर चार महिने बंद-: अभयारण्य परिसर अतिवृष्टीचा, बोटिंग क्लबच्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका
बामणोली : सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेला वासोटा किल्ला तसेच कोयना अभयारण्यात जाण्यास वन विभागाच्या वतीने प्रवेश मनाई करण्यात आली आाहे. अतिवृष्टी, वादळी वारे या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये, यासाठी १६ जून ते १५ आक्टोबरपर्यंत प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
कोयना अभयारण्य क्षेत्र तसेच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील सर्व ठिकाणी येणारी सर्व पर्यटन स्थळे ही अतिदुर्गम व अतिवृष्टीच्या प्रदेशात मोडतात. यामध्ये वासोटा चकदेव, नागेश्वर पाली, कुसापूर आदी पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. वासोट्याला यावर्षी विक्रमी पर्यटकांनी भेट देऊन निर्सग सौैंदर्याचा आस्वाद घेतला होता.
मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक तसेच गुजरातहून शेकडो पर्यटक, गिर्यारोहक कॅम्प यांनी वासोटा व नागेश्वर जंगल सफारीचा आंनद घेतला; पंरतु आता यापुढील चार महिने पावसाळ्यामुळे सर्वांना अभयारण्य क्षेत्रात संपूर्णत: मनाई करण्यात आली आहे. यामध्ये वन विभागबरोबर बोटक्लबलाही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.बामणोली येथील वासोट्याला जाणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव विभागाचे रितसर परवानगी घ्यावी लागत होती. या ठिकाणी बोटीने वासोट्याच्या पायथ्याजवळील मेट इंदवलीपर्यंत पाण्यातून तसेच किल्ल्यापर्यंत घनदाट जंगल व डोंगररांगातून प्रवास करावा लागतो, त्यामुळे एकप्रकारे जंगलसफारीचा थरारक अनुभव घेता येतो, यासाठी संपूर्ण दिवसामध्ये सुमारे बारा-तेरा तास प्रवास करावा लागतो.
त्यामुळे या सफारीचा थरारक अनुभव अनेक पर्यटक घेत असतात. यामध्ये वयस्कर व लहान मुले सहसा सहभागी होत नाहीत. मागील दोन वर्षांपासून प्रसिद्ध माध्यमांनी या वासोट्याची माहिती सर्वदूर पोहोचवली. त्यामुळे या वासोट्याला पर्यटकांची गर्दी वाढू लागली.
बंदीची कारणे...
सर्वाधिक पावासाचे प्रमाण
शेवाळमुळे जमीन घसरटी जळू, कानिट यांचा मोठा त्रास
वादळी वारे व मोठे वाहते ओढे याचा प्रतिकूल परिणाम
वादळी पावसात बोट चालवणे धोकादायक
जंगली प्राण्यापासून धोका
दीपावलीपासून १५ जूनपर्यंत हजारो पर्यटकांनी वासोट्याला भेटी दिल्या. त्यामुळे आमच्या बोटक्लबचा सुटीच्या दिवसात चांगला व्यवसाय झाला. मात्र पुढील चार महिने वासोटा प्रवेश बंदी असल्यामुळे आमचा बोटक्लबचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होणार आहे. त्यातून फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
धनाजी संकपाळ, बामणोली.